फलटण : मौजे कोळकी येथील विविध गट क्रमांकांच्या जमिनी भोगवटदार वर्ग-२ मधून भोगवटदार वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेत बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तहसील प्रशासनाने पुढाकार घेत फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी तहसीलदारांच्या आदेशान्वये केलेल्या तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले आहे.ही कारवाई स्वागतार्ह आहे. शासनाची फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर किंवा महसुली प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्यास कायद्याचा बडगा उगारलाच पाहिजे.मात्र, याच कारवाईमुळे आता तहसील प्रशासनाच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण झालेल आहेत.तहसीलदार साहेबांन कडून, एकाच प्रकारच्या तक्रारींना वेगवेगळा न्याय का ?
( एका बनावट मूल्यांकन दाखल्यावर गुन्हा दाखल; मग तहसील कार्यालयातील इतर बनावट कागदपत्रांचे आधारावर सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेवर तहसील कार्यालयात केलेल्या कारवाईचे काय ? फलटण तालुक्यातील नागरिकांमध्ये तहसीलदार साहेबांना बद्दल चर्चा : कायदा सर्वांसाठी समान आहे की कारवाईसाठी वेगवेगळे निकष ? )
आपल्या कार्यालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या वसुली दाखल्यांबाबत अनेक दिवसांपासून तक्रारी व अर्ज प्रलंबित असल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे.जर एका बनावट मूल्यांकन दाखल्याच्या प्रकरणात शासनाची फसवणूक झाल्याच्या संशयावरून थेट पोलिसांत तक्रार करण्याची तत्परता दाखविली जाते, तर मग यापूर्वीपासून आपल्या कार्यालयात धूळ खात पडलेल्या बनावट कागदपत्रांच्या तक्रारींची चौकशी कधी होणार ? की काही प्रकरणांसाठी कायद्याचा वेग वेगळा आणि काही प्रकरणांसाठी कायद्याची चाल वेगळी ?
फलटण तालुक्यातील नागरिकांमधून थेट सवाल केला जातोय ? तहसीलदार साहेब, हे केवळ कार्यालयीन आदेश काढणारे अधिकारी नाहीत.तर महसुली प्रशासनातील महत्त्वाच्या बाबींमध्ये कागदपत्रांची सत्यता, शासनाच्या हिताचे संरक्षण आणि कायदेशीर प्रक्रियेची सुचिता राखण्याची जबाबदारी असणारे प्रशासकीय अधिकारी आहेत.मग प्रश्न असा आहे—बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक झाल्याची तक्रार तहसील कार्यालयात आली असेल, तर तिची निष्पक्ष चौकशी करण्याची जबाबदारी कोणाची ? तक्रारींवर निर्णय घेण्यासाठी काही विशिष्ट कालमर्यादा आहे का ? अनेक दिवस प्रलंबित पडलेल्या तक्रारी वरती कारवाई कधी होणार व त्या तक्रारी खऱ्या आढळल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची शिफारस केली जाणार का ? आणि सर्वात महत्त्वाचे—तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास त्याची प्रशासकीय जबाबदारी निश्चित केली जाणार का ? कथित बनावट कागदपत्रांवर आधारित ताबा प्रक्रिया झाली असेल तर ? यापेक्षाही गंभीर प्रश्न म्हणजे, बनावट कागदपत्रांच्या आधारे तहसील प्रशासनाच्या आदेशाने एखाद्या व्यक्तीची जमीन, मालमत्ता किंवा हक्कासंदर्भात ताबा/वसुलीची प्रक्रिया करण्यात आली असेल तर त्याची पुन्हा तपासणी होणार का ? जर मूळ कागदपत्रच संशयास्पद किंवा बनावट असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले, तर त्या कागदपत्रावर आधारित पुढील संपूर्ण कार्यवाहीची वैधता तपासणे अपरिहार्य ठरणार का ? ताबा प्रक्रिया, वसुली दाखले, पंचनामे, आदेश आणि संबंधित महसुली अभिलेखांची पुनर्तपासणी करण्याचे तात्पर्य तहसील प्रशासन दाखवणार का ? की एकदा आदेश निघाला की, त्याच्या पायाभूत कागदपत्रांची सत्यता तपासण्याची जबाबदारी संपते ? ‘कायदा सर्वांसाठी समान’ — मग कारवाईचे निकषही समान असावेत ! भारतीय संविधानातील अनुच्छेद १४ कायद्यापुढे समानता आणि कायद्यांचे समान संरक्षण याची हमी देतो.म्हणजेच साधा प्रश्न—एका प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आरोपावरून शासनाची फसवणूक मानून पोलिसांत गुन्हा दाखल केला जात असेल, तर त्याच स्वरूपाच्या तक्रारींवरही समान निकष लागू होणार की नाही ? जर होणार असतील, तर—प्रलंबित तक्रारींची चौकशी कधी ? बनावट वसुली दाखल्यांची पडताळणी कधी ? त्या आधारे झालेल्या ताबा प्रक्रियेची तपासणी कधी ? शासनाची संभाव्य महसुली हानी निश्चित करून वसुली कधी ?आणि दोष आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई कधी ? फलटणकरांना उत्तर हवे आहे ! एका प्रकरणात कारवाई करून प्रशासनाने आपली कठोर भूमिका दाखविली आहे. आता त्याच कठोरतेची कसोटी इतर प्रलंबित तक्रारींमध्ये लागणार आहे.का ?कारवाई निवडक नको; कायद्यानुसार, पुराव्यानुसार आणि समान निकषांवर हवी.तहसीलदार साहेबांना फलटण तालुक्यातील जनतेचा सवाल साहेब,“कायदा सर्वांसाठी समान आहे” असे आपण म्हणणार असाल, तर त्या समानतेचा प्रत्यय सर्व तक्रारदारांना आपल्या कार्यालयाच्या कारवाईतून मिळणार का ? एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखविले; आता इतर बनावट कागदपत्रांच्या प्रकरणांतही तेच धाडस दाखविणार का ? हा प्रश्न केवळ एखाद्या व्यक्तीचा नसून महसूल प्रशासनाच्या पारदर्शकतेचा, निष्पक्षतेचा आणि जनतेच्या कायद्यावरील विश्वासाचा आहे.आता उत्तराची प्रतीक्षा आहे—कारवाई सर्वांसाठी समान की निवडक व्ही आय पीं साठी वेगळा ? असे प्रश्नचिन्ह तालुक्यातील जनतेच्या मनात निर्माण झाले आहे ?