फलटणच्या महसूल यंत्रणेवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची सावट ?

("फलटणच्या महसूल यंत्रणेवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची सावट ?"
   "मंडळ अधिकाऱ्याविरोधातील लाच मागणीच्या तक्रारींनी खळबळ आमदारांनी कारवाईबाबत भूमिका स्पष्ट करावी असा सर्वसामान्य जनतेतून सुर" )


    फलटण (प्रतिनिधी) :फलटण तालुक्यातील महसूल विभागाच्या कामकाजाबाबत शेतकरी व नागरिकांकडून होत असलेल्या नाराजीला आता गंभीर स्वरूप आले आहे. तरडगाव मंडल अधिकारी राहुल खाडे यांच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांनी जनता दरबारामध्ये केलेल्या लाच मागणीच्या आरोपांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असून, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.

          " दिनांक ७ सप्टेंबर रोजी फलटण येथे तालुक्यातील लोकांच्या समस्या जाणून त्या दूर करण्यासाठी जनता दरबार महाराजा मंगल कार्यालय ,येथे पार पडला."

    येथे झालेल्या आमसभेत काही शेतकऱ्यांनी राहुल खाडे या संबंधित मंडल अधिकाऱ्यांकडून महसूल विषयक कामांसाठी पैशांची मागणी केली जात असल्याचे आरोप केले आहेत . या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी, संबंधित शेतकऱ्यांचे जबाब नोंदवावेत आणि महसूल कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी करावी, अशी लोकांच्यातून मागणी होताना दिसत आहे.

   " लोकांचे नेमके आरोप काय ? "

       व्हिडिओमध्ये काही व्यक्तींनी संबंधित मंडळ अधिकाऱ्याविरोधात विशिष्ट आर्थिक मागण्यांचे आरोप केले आहेत. शेतकरी सुरेश दादाराम अडसुळ यांनी ₹25,000 ची मागणी करून त्यापैकी ₹10,000 स्वीकारल्याचा आरोप केला आहे . तसेच राकेश संपत साळुंखे यांच्याकडून ₹7,000 आणि दीपक शिवाजी साळुंखे यांच्याकडून ₹7,000 मागितल्याचा आरोप आहे. सुहास काशीद यांच्या हि संबंधित तक्रारीचाही व्हिडिओमध्ये उल्लेख आहे. हे आरोप तक्रारदारांनी केलेले आहेत आमदारांनी आता भूमिका स्पष्ट करावी. अशी फलटण तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे 
   या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर फलटणचे लोकप्रतिनिधी आणि आमदार यांची भूमिका काय?   असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.संबंधित मंडळ अधिकाऱ्याविरोधातील आरोपांवर आमदारांनी प्रशासनाकडे कोणती कारवाई करण्याची मागणी केली आहे ? जर चौकशी सुरू झाली किंवा आरोप प्रथमदर्शनी गंभीर आढळले, तर प्रशासनाकडून पुढीलपैकी कोणती कार्यवाही अपेक्षित आहे, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे 
    " विभागीय चौकशी सुरू केली जाणार का ?" चौकशी पूर्ण होईपर्यंत बदली किंवा अन्य प्रशासकीय उपाय केला जाणार का ? आरोप सिद्ध झाल्यास निलंबनाची कारवाई होणार का ? दोष सिद्ध झाल्यास सेवाशर्तींनुसार बडतर्फी/कठोर शिस्तभंगाची कार्यवाही होणार का ? संबंधित काळातील महसूल प्रकरणांची विशेष परीक्षणे केली जाणार का ? 
   "या प्रश्नांवर केवळ राजकीय प्रतिक्रिया न देता अधिकृतपणे कोणती कार्यवाही सुरू आहे आणि पुढे काय केले जाणार आहे, याची माहिती जनतेसमोर येणे अपेक्षित आहे अशी चर्चा तालुक्यातील जनतेमध्ये आहे ."

   "उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार, मंडळ अधिकारी राहुल खाडे यांच्यावर कारवाई कधी करणार की करणारच नाहीत "......!!!!!

     असा प्रश्न तालुक्यातील जनतेत निर्माण झाला आहे. मंडळ अधिकारी हा महसूल प्रशासनातील अधीनस्थ अधिकारी असताना त्याच्या कामकाजा बाबत इतक्या गंभीर तक्रारी सार्वजनिक व्यासपीठावर होत असतील, तर संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या नियंत्रण व पर्यवेक्षणाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

"तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी या आरोपांची दखल घेतली आहे का ? संबंधित अधिकाऱ्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आली आहेत का ? विभागीय चौकशीची शिफारस केली आहे का ? तसेच महसूल कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांची तपासणी करण्यात येणार आहे का ? "

याबाबत नागरिकांना माहिती मिळणे आवश्यक आहे.संबंधित अधिकाऱ्यानी हाताळलेल्या महसूल प्रकरणांची, कार्यालयीन नोंदींची, अर्जांची, आदेशांची आणि डिजिटल रेकॉर्डची तपासणी करण्याची मागणी जनतेतून करण्यात येत आहे.
   "सर्वांसमोर अरेरावीचा आरोप; प्रशासनाची जबाबदारी काय ? "
           महसूल कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या शेतकरी व नागरिकांशी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वर्तन हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. सार्वजनिक ठिकाणी अधिकारी नागरिकांशी उद्धट किंवा अरेरावीच्या पद्धतीने वागत असल्याच्या तक्रारी असतील, तर त्या केवळ वैयक्तिक वर्तनाचा विषय न राहता प्रशासकीय शिस्त आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचा प्रश्न ठरतो.
        "महसूल अधिकाऱ्यांच्या वर्तनावरून महसूल विभागावर प्रश्नचिन्ह" 
   अशा तक्रारी वारंवार समोर येत असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची स्वतंत्रपणे दखल घेणे आवश्यक आहे. 
    “काम करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात” अशी भावना कर्मचारी व अधिकाऱ्यांच्यात निर्माण झाली आहे का ? 
    असे हि आरोप करण्यात आले आहेत की, काही शेतकऱ्यांना त्यांचे वैध महसूलविषयक काम पैसे दिल्याशिवाय पूर्ण होणार नाही, अशी परिस्थिती असल्याचे भासवले जात असल्याची तक्रार आहे.
    "तसेच कामाच्या स्वरूपानुसार रक्कम बदलत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे."
जर हे आरोप चौकशीत सिद्ध झाले, तर तो केवळ एखाद्या व्यक्ती विरुद्धचा प्रश्न न राहता महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीशी संबंधित गंभीर विषय ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची स्वतंत्र नोंद, तपासणी आणि निपटारा करण्याची पारदर्शक व्यवस्था आवश्यक आहे.सोशल मीडियावरील व्हिडिओंनी प्रश्न अधिक गंभीर केला.
                                सध्या महसूल विभागातील गैरप्रकारांबाबतचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने फलटण शहर व तालुक्यात या विषयाची चर्चा होत आहे. जनता दरबारा मधील आमसभेचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून त्यातील शेतकऱ्यांची ओळख पटवून त्यांचे जबाब नोंदवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.


"तसेच व्हिडिओमध्ये केलेल्या आरोपांना एकमेव पुरावा न मानता संबंधित महसूल फाईल, अर्ज, नोंदी, साक्षीदार आणि उपलब्ध इलेक्ट्रॉनिक किंवा आर्थिक पुराव्यांशी त्यांची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे."

      “संपूर्ण महसूल विभागच भ्रष्ट आहे” 

      असा निष्कर्ष काढण्यापूर्वी चौकशी आवश्यक! सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण महसूल यंत्रणेबाबत अविश्वास निर्माण होणे ही प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे.त्याऐवजी संबंधित आरोपांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि दस्तऐवजाधारित चौकशी होणे गरजेचे आहे. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई आणि आरोप सिद्ध न झाल्यास वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हीच पारदर्शकता प्रशासनाच्याकडून अपेक्षित आहे. 
    ACB कडे स्वतंत्र चौकशीची मागणी जनतेतून करण्यात येत आहे संबंधित अधिकाऱ्याच्या सध्याच्या तसेच पूर्वीच्या वडूज, ता. खटाव येथील नियुक्तीच्या काळातील तक्रारींचीही स्वतंत्र पडताळणी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच कायद्यानुसार त्यांच्या घोषित मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि उत्पन्नाच्या तुलनेत मालमत्तेची पडताळणी करण्याची मागणी तक्रारीत करण्यात येत आहे.

   आता प्रशासनाकडून अपेक्षा काय ? या प्रकरणात नागरिकांच्या मुख्य अपेक्षा पुढीलप्रमाणे आहेत


1. आमसभेत आरोप करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे जबाब नोंदवावेत.
2. संबंधित व्हिडिओंची अधिकृत पडताळणी करावी.
3. संबंधित अधिकाऱ्याच्या महसूल कामकाजाच्या नोंदी तपासाव्यात.
4. आर्थिक मागण्यांशी संबंधित पुरावे उपलब्ध असल्यास त्यांची कायदेशीर तपासणी करावी.
5. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी आवश्यक आहे का, याचा निर्णय घ्यावा.
6. चौकशीदरम्यान तक्रारदार शेतकऱ्यांवर कोणताही दबाव किंवा प्रतिशोध होऊ नये, याची काळजी घ्यावी.
7. आरोप सिद्ध झाल्यास कायद्यानुसार शिस्तभंग व अन्य योग्य कारवाई करावी.
8. चौकशीचे निष्कर्ष आणि केलेली कार्यवाही जनतेसमोर पारदर्शकपणे मांडावी.
    फलटणच्या जनतेला आता उत्तरांची प्रतीक्षा महसूल कार्यालय हे शेतकरी, जमीनधारक आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित प्रशासनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे या कार्यालया बाबत निर्माण झालेला अविश्वास दूर करण्यासाठी केवळ आश्वासने पुरेशी ठरणार नाहीत.

"आमदार साहेब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि वरिष्ठ महसूल प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती पावले उचलणार ? विभागीय चौकशी होणार का ? चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणती प्रशासकीय कार्यवाही केली जाणार ? आणि आरोप सिद्ध झाल्यास जबाबदारी निश्चित करून काय कारवाई केली जाणार ? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे आता फलटण तालुक्यातील जनतेला अपेक्षित आहेत."

"कारण सोशल मीडियावरील व्हिडिओंपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे त्या व्हिडिओंमधील आरोपांची निष्पक्ष चौकशी "आणि त्यानंतर होणारी अधिकृत कारवाई.
Previous Post Next Post