राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ) या पक्षाच्या फलटण शहराध्यक्षपदी अमीरभाई शेख यांची नियुक्ती

   !....जनतेच्या प्रश्नांना मिळणार नवा आवाज....!
                                                                
   सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या नेतृत्वाला पक्षाने दिलेली महत्त्वाची जबाबदारी

फलटण :  सर्व सामान्य, गरजू आणि अन्यायग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पुढे येत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आमिरभाई शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरदचंद्र पवार गट)           फलटण शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
फलटण शहर व तालुक्यात आपल्या आगळ्या-वेगळ्या कार्यशैलीमुळे आमिरभाई शेख यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणे, गरजूंच्या अडचणी समजून घेणे आणि अन्यायाविरोधात ठामपणे आवाज उठवणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये मानली जातात.
लोकांच्या प्रश्नांकडे केवळ समस्या म्हणून न पाहता, त्यावर न्याय्य मिळवून देण्यासाठी  सातत्याने प्रयत्न करण्याचा त्यांचा दृष्टिकोन नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारा ठरला आहे. आजपर्यंत त्यांनी केलेल्या कार्याची आणि जनसामान्यांशी असलेल्या त्यांच्या नात्याची व त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची ही नियुक्ती म्हणजे एक प्रकारची पोच पावतीच असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त होत आहे.
शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अमीर भाई शेख यांनी आपले विचार व्यक्त केले.

  पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन शहराच्या विविध भागांमध्ये संघटनात्मक कामाला गती देणे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे पक्षाच्या माध्यमातून मांडणे,व ते सोडविण्यासाठी आगामी काळात विशेष प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

आमिर भाई शेख यांच्या नियुक्तीचे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक तसेच नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या या नेतृत्वाला मिळालेली नवी जबाबदारी त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीला निश्चितच नवी दिशा देणारी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

                 सामान्य माणसाच्या हक्कासाठी संघर्ष, अन्यायाविरोधात आवाज आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची कार्यपद्धती शहराध्यक्षपदाच्या माध्यमातून अधिक प्रभावशाली होणार.
 आमिरभाई शेख यांच्या नियुक्तीमुळे फलटण शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)या पक्षाला नवी ऊर्जा मिळण्याची अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
Previous Post Next Post