सहकाराच्या नावाखाली सावकारीचा संशय !

       🔥लोकांच्या हक्कासाठी सत्याचा ध्यास🔥 
       सहकाराच्या नावाखाली सावकारीचा संशय !

फलटण : प्रतिनिधी 
फलटणसह सातारा जिल्ह्यातील पतसंस्था व को-ऑपरेटिव्ह बँकांची सखोल चौकशी करा अशी चर्चा फलटण तालुका व सातारा जिल्हा पंचक्रोशी मधील जनतेत होत आहे !

  "यशवंत को-ऑपरेटिव्ह बँके मध्ये संचालक व व्यवस्थापनाकडून झालेल्याआर्थिक घोटाळ्याची चौकशी व झालेल्या कारवाई.नंतर आता मोठ्या पतसंस्थेच्या कारभाराची ही चौकशी करण्याची मागणी फलटण सह सातारा जिल्ह्यातील जनतेतून व विविध संघटनांकडून करण्यात येत आहे."

 कर्ज वसुली, मालमत्तांचे व्यवहार आणि कथित बनावट खोट्या नोटरी मॉर्गेज दस्ताची, व इतर बनावट कागदपत्रांच्या आधारावर सहाय्यक निबंधकांकडून मिळवलेल्या जप्ती आदेशांची निष्पक्ष तपासणी होणार का ? असा सवाल सर्वसामान्य जनतेतून चर्चिला जात आहे. लवकरच या सर्व प्रकारांबद्दल वरिष्ठांकडे करणार न्यायाची मागणी.
          या सर्व गोष्टी राजरोस व बिंदास पणे करण्या मागचा चा सहकार महर्षीचा पाठीराखा कोण ? हा ही प्रश्न उपस्थित होत आहे. "सर्वसामान्य जनतेच्या टाळूवरचे लोणी खाणारी ही टोळी लवकरच होणार जेरबंद....!"

  फलटणसह सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील बँका व पतसंस्था यांची सखोल चौकशी करा !

  यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेनंतर आता फलटण तालुक्यात हेड ऑफिस असणाऱ्या व संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये शाखाचे जाळे असणाऱ्या मोठ्या पतसंस्थेच्या कारभाराचीही चौकशी करण्याची मागणी लोकांच्या मधून जोर धरत आहे.
  कर्ज वसुलीतून , मालमत्तेची लूट , गैरव्यवहार,अपहार आणि कथित बनावट कागदपत्रांच्या आधारावरती 36 टक्के पेक्षा जास्त व्याज दराने सावकारी पद्धतीने होणारी वसुली याची निष्पक्षपाती पणे तपासणी होणार का ?

 🔴 "सहकाराचा मूळ उद्देश कुठे हरवला ?"

    सहकार क्षेत्राची मुळातच निर्मिती ही सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक आधार देण्यासाठी निर्मिती झाली आहे . मात्र, सहकाराच्या नावाखाली सावकार की होऊन काही ठिकाणी पतसंस्थांकडून थकीत कर्जाच्या व्याजाला,व्याज लावून चक्रवाढ व्याजाप्रमाणे 36% टक्क्यापेक्षा जास्त व्याजदराने कर्जाची वसुली होताना दिसून येत आहे 

" लाखो रुपयांच्या कर्जासाठी कोट्यावधी रुपयांच्या  मालमत्तेची लूट होत आहे सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी व गोरगरीब जनतेची कर्जाच्या अडून पतसंस्था चालक व व्यवस्थापन संगनमताने कोट्यावधीची मालमत्ता लुटताना दिसून येत आहे"  

         जर का अशा प्रकारचा कर्जदारांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी असतील, तर त्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता त्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

     "फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात सहकारी पतसंस्थाच्या आणि कर्जवसुलीच्या प्रक्रियेबाबत उपस्थित होणारे प्रश्न गंभीर आहेत. विशेषतः मोठ्या शाखाच्या जाळ्याद्वारे कार्यरत असलेल्या पतसंस्थांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आहे का, कर्जदारांच्या मालमत्तांशी संबंधित कार्यवाही कायदेशीर प्रक्रियेनुसार केली जाते आहे का ?आणि तक्रारदारांना न्याय मिळतो आहे का ? याची तपासणी सहकाराशी संबंधित असणाऱ्या यंत्रणांनी केली पाहिजे."

       यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेसंदर्भातील चर्चेनंतर आता फलटण तालुक्यातील आणखी एका मोठ्या पतसंस्थेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी पुढे येत असेल, तर संबंधित पतसंस्थेची,तक्रारीनुसार आर्थिक नोंदी, कर्जप्रकरणे, कर्ज प्रकरणांमध्ये वसुली दाखला मिळवण्यासाठी वापरली गेलेली कागदपत्रे आणि मालमत्तेच्या जप्ती आदेशाची व जप्ती बोजा चढवलेल्या मालमत्तेची, कर्ज प्रकरणातील रकमेच्या व्यवहारांची निपक्ष व स्वतंत्रपणे पडताळणी तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे सखोल चौकशी होणे आवश्यक. चौकशी दरम्यान दोषी आढळल्यास.

       "त्या पतसंस्थे वर को-ऑपरेटिव्ह ऍक्टच्या नियमानुसार कारवाई होणे आवश्यक ?"

      "लवकरच बेकायदेशीर वसुलीतून लूट करणाऱ्या पतसंस्थेच्या विरोधात कारवाई होण्यासाठी संस्थेच्या नावासह आंदोलनात्मक लढा उभारला जाणार अशी जनतेमध्ये चर्चा "

 🔴"संचालक मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ?"

  " एखाद्या पतसंस्थेच्या संबंधित संचालक मंडळातील काही संचालकांच्या व व्यवस्थापनाच्या कथित गैरव्यवहारांबाबत आरोप केले जात असतील, तर त्यांची सत्यता कायद्याच्या आधारे अधिकृत पणे तपासली पाहिजे."
  कर्ज वसुलीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर झाला आहे का, मालमत्तांशी संबंधित व्यवहारांमध्ये नियमांचे उल्लंघन झाले आहे का ? याचा तपास होणे महत्त्वाचे आहे.
        संबंधित कर्जखाती, कर्जवाटपाची प्रक्रिया, वसुली आदेश, मालमत्तांच्या नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी झाली पाहिजे.
    गैरव्यवहाराचे ठोस पुरावे आढळल्यास संबंधित सक्षम यंत्रणांनी कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे.
   " प्रकरणाच्या स्वरूपानुसार आर्थिक गुन्हे तपास यंत्रणा, आयकर विभाग किंवा अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED च्या ) चौकशीची आवश्यकता आहे का, याचाही कायदेशीर निकषांनुसार विचार केला पाहिजे. "

🔴 "कर्ज वसुली की मालमत्तांवर कब्जा ? "

        कर्जाची परतफेड न झाल्यास संबंधित संस्थांना कायद्यानुसार वसुलीची कार्यवाही करण्याचा अधिकार असू शकतो. परंतु त्या अधिकाराचा वापर करताना कर्जदारांचे कायदेशीर हक्क, प्रक्रिया, कागदपत्रांची सत्यता आणि सक्षम प्राधिकरणाचे आदेश यांचे पालन झाले पाहिजेत.

" लाखो रुपयांच्या कर्जासाठी कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेची लूट होत आहे सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी व गोरगरीब जनतेची कर्जाच्या अडून पतसंस्था चालक व व्यवस्थापन संगनमताने कोट्यावधीची मालमत्ता लुटताना दिसून येत आहे" 
 
  " कर्ज वसुलीच्या नावाखाली धमकावणे, खोटी कागदपत्रे वापरणे, बेकायदेशीर दबाव आणणे खोट्या केसेस दाखल करणे किंवा तक्रारदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याचे पुराव्यांसह समोर आल्यास अशा प्रकरणांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे."
              "कायद्याच्या चौकटीत राहून कर्ज वसुली 
करणे आणि आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना बेकायदेशीर त्रासापासून संरक्षण देणे, या दोन्ही गोष्टी न्यायव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या आहेत."

 ⚠️ आर्थिक तणावग्रस्त कुटुंबांच्या वेदना कोण समजून घेणार........?

       कर्जाचा वाढता बोजा, लाखो रुपयाच्या कर्जासाठी  कोट्यावधी रुपयाची मालमत्ता गमावण्याची भीती, कायदेशीर प्रकरणांचा ताण आणि कुटुंबाच्या भविष्याबद्दलची चिंता यांमुळे काही कर्जदार गंभीर मानसिक तणावाला सामोरे जाऊ शकतात.अशा परिस्थितीत प्रशासनाने तक्रारींकडे दुर्लक्ष न करता कायदेशीर मदत, समुपदेशन आणि तक्रार निवारणाची व्यवस्था प्रभावीपणे उपलब्ध करून दिली पाहिजे.

   "कर्ज वसुलीशी संबंधित प्रकरणांमध्ये आत्महत्येच्या घटना घडल्यास किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त होण्यापर्यंत त्रास दिल्यास प्रत्येक घटनेचा स्वतंत्र आणि निष्पक्ष तपास झाला पाहिजे. तपासात दोषी असणाऱ्या संचालक व  व्यवस्थापनावर वरती कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे."
 
    "एखाद्या कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळण्या ऐवजी ते अधिक संकटात ढकलले जात असेल, तर त्या परिस्थितीचे गांभीर्याने परीक्षण होणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे."

  फलटण तालुका आणि सातारा जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांबाबत तक्रारी असतील, तर पुढील बाबींची तपासणी करण्याची मागणी करण्यात यावी. 
  ▪️ कर्जवाटप आणि वसुली व्यवहारांचे लेखापरीक्षण.
▪️ कर्जदारांच्या मालमत्तांशी संबंधित कागदपत्रांची सत्यता.
▪️ कर्जवसुली आदेश आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन.
▪️ संचालक मंडळाच्या आर्थिक व्यवहारांची नियमानुसार तपासणी.
▪️ धमकी, दबाव किंवा बनावट कागदपत्रांबाबतच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी.
▪️ गैरव्यवहाराचे पुरावे आढळल्यास संबंधित सक्षम प्राधिकरणामार्फत कायदेशीर कारवाई.
▪️ प्रकरणाच्या स्वरूपानुसार आयकर विभाग किंवा ED चौकशीची आवश्यकता आहे का, याचा विचार.

  🟥" जनतेच्या न्यायासाठी संघटनांनी एकत्र यावे !"

   "सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य कर्जदार, शेतकरी, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सामाजिक संघटना, कामगार संघटना, जनहितासाठी कार्यरत राजकीय पक्ष आणि कायदेविषयक मदत देणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे."
    " संबंधित तक्रारी सहकार विभाग, जिल्हा प्रशासन आणि आवश्यकते नुसार सक्षम तपास यंत्रणांकडे सादर करून त्यावर लेखी उत्तर आणि कारवाईचा अहवाल मागवला पाहिजे."
   🔴 "सहकार क्षेत्रातील प्रत्येक व्यवहार पारदर्शक असेल, तर निष्पक्ष चौकशीला विरोध नसावा ?"
   🔴 "गैरव्यवहाराचे पुरावे आढळले, तर दोषींवर कारवाई करण्यास विलंब होऊ नये ? 
    "सहकार क्षेत्रावरील जनतेचा विश्वास टिकवायचा असेल, तर कर्जदारांचे कायदेशीर हक्क, संस्थांची आर्थिक पारदर्शकता आणि प्रशासनाची निष्पक्षता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल."

🔴"सर्वसामान्य जनतेला न्याय मिळालाच पाहिजे. पुरावे,कायदा आणि निष्पक्ष चौकशीच्याआधारावर! 






Previous Post Next Post