(फलटणच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातील पक्षपाती कारभाराबाबत जनतेची पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे तक्रार निष्पक्ष कामकाजाची मागणी : पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लोकांना यावेळी शब्द दिला की महसूल विभागातील अधिकाऱ्याच्या कामकाजा,संदर्भात बदल नाही झाला व वर्तनात सुधारणा न झाल्यास,पालकमंत्री म्हणून मला मा.मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे या विषयाची तक्रार मांडावी लागेल आसा इशारा त्यांनी दिला आहे )
फलटण : सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई फलटण तालुक्याच्या पाहणी दौऱ्यावर असताना फलटण तालुक्यातील नागरिकांन कडून अनेक कामकाजा संदर्भात तक्रारी करण्यात आल्या
फलटण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील पक्षपाती कार्यपद्धती आणि कामकाजाच्या संस्कृती बाबत हि तक्रारदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. कार्यालयातील कामकाज निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांना समान न्याय देणारे असावे, अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे. त्यावेळेस पालकमंत्र्यांनी असे सांगितले की मी स्वतः प्रांताधिकार्यांना फोन करून सांगितले आहे की तुम्ही कुठलीही राजकीय बाजू घेऊन काम करता कामा नये तुम्ही सरकारी अधिकारी आहात तुम्हाला जी न्यायिक बाजू असेल वस्तुनिष्ठ बाजू असेल त्याप्रमाणे प्रामाणिक पणे तुम्हाला काम करावे लागेल असे सांगितले आहे.
" पक्षपाती कार्यपद्धती बाबत आक्षेप"
उपविभागीय अधिकारी कार्यालयात विविध महसुली प्रकरणे, अपील आणि नागरिकांच्या तक्रारींची सुनावणी होत असते. अशा महत्त्वाच्या कार्यालयात प्रत्येक नागरिकाला समान वागणूक मिळणे आणि कायद्याच्या चौकटीत निष्पक्ष निर्णय होणे अपेक्षित आहे. मात्र, कार्यालयातील पक्षपाती कार्यसंस्कृतीमुळे तक्रारदारांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे त्यांच्या म्हणण्यावरून स्पष्ट होते.संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कामकाजाच्या पद्धतीत बदल करून सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची निष्पक्षपणे दखल घ्यावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी हि व्यक्त केली आहे. कोणत्याही व्यक्तीचा किंवा पक्षाचा प्रभाव न ठेवता नियमांनुसार निर्णय घेणे ही प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
"निष्पक्ष आणि पारदर्शक कामकाजाची अपेक्षा"
शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना न्याय मिळावा, त्यांच्या अर्जांवर वेळेत कार्यवाही व्हावी आणि सुनावणीदरम्यान सर्व पक्षांना समान संधी मिळावी, अशी नागरिकांची अपेक्षा असते. विशेषतः महसूल विभागातील प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांची निष्पक्षता आणि पारदर्शकता महत्त्वाची मानली जाते. तक्रारदारांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कामकाजाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची वरिष्ठ प्रशासनाने दखल घ्यावी आणि आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या तक्रारींची योग्य चौकशी करून कार्यालयात विश्वासार्ह आणि न्याय्य कार्यसंस्कृती निर्माण करण्याची गरज आहे.
" जर कामकाजात काही बदल नाही झाला तर "
संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तनात,कार्यालयीन कामकाजात आणि कार्यपद्धतीत सुधारणा झाली नाही, व अपेक्षित बदल न झाल्यास या प्रकरणी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी मा. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
या इशाऱ्यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कामकाजाबाबत वरिष्ठ पातळीवर लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठ प्रशासनाने दखल घेण्याची मागणी शासकीय यंत्रणेवरील नागरिकांचा विश्वास कायम राखण्यासाठी निष्पक्ष चौकशी, पारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि जबाबदार प्रशासकीय वर्तन आवश्यक आहे. त्यामुळे तक्रारदारांनी केलेल्या आरोपांची वस्तुनिष्ठ पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.आता या तक्रारींची वरिष्ठ प्रशासनाकडून दखल घेतली जाणार का,? संबंधित कार्यालयाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणार का ? आणि तक्रारदारांच्या मागण्यांवर काय ? निर्णय घेतला जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.